मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्यात दौऱ्यासाठी असतील त्या जिल्ह्यातील अधिकारी इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पुष्पगुच्छ आणणार नाहीत. तसंच मुख्यमंत्र्यांना पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनीची प्रथा देखील त्यांच्या दौऱ्यादरम्यान बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत.
याबाबतचे एक पत्रक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी काढले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यावेळी स्वागतासाठी पुष्पगुच्छ देणं तसंच पोलिस मानवंदना देणं बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं आता इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या नव्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याबाबत नवी नियमावलीबाबत प्रसिद्ध कलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “दौर्यात स्वागतासाठी कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाहीत. दौर्याच्यावेळी पोलिस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा माझ्या दौर्यात बंद ठेवण्यात यावी. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, एसपी, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या नियमावलीचं पालन करावं.”






