व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळांना भेट देण्यासाठी ज्याप्रमाणे एन्ट्री घ्यायचे, अगदी त्याचप्रमाणे एक लहान मुलगा भारदस्त दाढी, कपाळी टिळा आणि पांढरी पॅन्ट, शर्ट असा मुख्यमंत्र्यांचा गेटअप करून एन्ट्री घेताना दिसतोय. यावेळी त्याच्या आजूबाजूला मोठा पोलिस फौज-फाटा दिसत असून जो त्यांना मार्ग करून देण्याचे काम करत आहे. यावेळी तो लहान मुलगा गणपतीच्या पाया पडून माध्यमांसमोर मुख्यमंत्री ज्या प्रकारे संवाद साधण्यासाठी उभे राहतात त्याचप्रमाणे उभा राहतो. यावेळी एक मुलगा त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतो, तेव्हा तो हसून त्याला सेल्फीही देतो. यानंतर मुख्यमंत्र्यांसारखं चेहऱ्यावर स्मित हास्य आणून माध्यमांसमोर हात उंचावून नमस्कार करतो. यानंतर अगदी त्यांच्यासारखेच हावभाव करत माईकवर बोलतो आणि नंतर खिशातील मोबाईल काढत त्यावर बोलत निघून जातो.
- Advertisement -