दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी, दौरे, सभांचा धडाका अन् आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनंतर नेते मंडळी आता निकालाची वाट पाहत आहेत. एकीकडे लोकसभेत प्रचाराचा धुरळा उडवल्यानंतर उद्धव ठाकरे हे परदेशात गेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेतीत रमल्याचे पाहायला मिळाले. या गाव भेटीचा सुंदर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदे यांनी शेअर केला असून ‘परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
https://x.com/mieknathshinde/status/1796058458179170308?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1796058458179170308%7Ctwgr%5E4a5089df2f7355e941688cb8dbb245ee9f36d99a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmaharashtra%2Fcm-eknath-shinde-visit-dare-village-in-satara-district-and-worked-in-the-fields-watch-video-gp98