काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी (१५ जुलै) नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे आमच्याकडे २१० आमदार आहेत. ही मागणी हास्यास्पद आहे. मंत्री राहिलेला माणूसाने सत्ताधाऱ्यांकडे २१० आमदारांचं संख्याबळ असताना राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं हास्यस्पद आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं.”
राज्य आणि केंद्रातील विकासाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सरकारला पाठिंबा दिला असून तिन्ही पक्षांनी मिळून आता मार्गक्रमण करायचे आहे. याक्षणी सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून भक्कमपणे सरकारची वाटचाल पुढे सुरू आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.