मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाचा आनंद सगळीकडे पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी भेट देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा बसवण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलावूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरूख खान आणि ‘सुलतान’ म्हणजेच सलमान खान हे दोघेही मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनसाठी पोहचले होते.बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरूख खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होती. तर सलमान खानसोबत त्याची बहीण अप्रिता आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी सर्वांनी एकत्र फोटो सेशनही केले.