मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. जुलै महिन्यांपासूनचे पैसे महिल्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. दर महिन्याला १५०० रुपये राज्य शासन देणार आहे. या योजनेसाठी १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची काही तांत्रिक पडताळणी केली जात आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात १ रुपया जमा केला जाणार आहे. हा एक रुपयाही सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही. तसेच हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहोत. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.