मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पूर्वनियोजित बर्लिन (जर्मनी) आणि लंडन दौरा पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्योग तंत्रज्ञानाशी संबंधित करार आणि तिथल्या मराठी भाषिक जनतेशी संवाद, असं या दौऱ्याचं स्वरुप होतं. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा 10 दिवसांचा पूर्वनियोजित दौरा होता, पण सध्याच्या राजकीय घडामोडी आणि काही वैयक्तिक कारणांमुळे हा दौरा मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.news18 मराठीने सदर वृत्त दिले आहे.