Saturday, February 15, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात दुचाकीवर प्रवेश, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ‘हे’आदेश

अहमदनगर दि. 5 जानेवारी :- वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्हयात राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हयात सन २०२२-२०२३ मध्ये घडलेल्या अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचा-यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे. या अपघातांपैकी 70 ते 80: अपघात हे फक्त दुचाकी व पादचा-यांचे आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेटट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कलम 194 ड मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला आहे.

कलम 194 ड अन्वये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करतांना आढळून आल्यास 194 ड च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून कार्यालयातील अशा विनाहेल्मेट दुचाकीवर येणा-यांची यादी परिवहन कार्यालयास कळविण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर मोटार वाहन काय‌द्यातील विहीत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles