नगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेमध्ये एका तरुणाने गाडी लावून नियमांचे उल्लंघन केले. त्यावर आक्षेप घेतल्यानंतरही तो उद्धटपणे वागत होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला चांगलीच अद्दल घडवत दंड भरायला लावला.आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांची स्वतःची गाडी लावतात त्या ठिकाणी आज दुसऱ्याची गाडी लावली होती. महाराष्ट्र शासन असा त्या गाडीवर उल्लेख होता जिल्हाधिकारी सिद्धाराम साली मठ हे जेवण झाल्यावर परत आल्यानंतर त्यांना या ठिकाणी गाडी दिसली. त्यांनी ती गाडी बाजूला करण्यास सांगितली मात्र संबंधित चालकाने त्यास नकार दिला.त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत गाडी काढण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अरेरावीची भाषा करत उद्धटपणे उत्तरे दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ वाहतूक शाखेला या संदर्भातली माहिती दिली. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले व त्यांनी संबंधित गाडी चालकाची चौकशी केल्यानंतर त्यांना या ठिकाणी संबंधित चालकाकडे लायसन्स नसल्याचे लक्षात आले व इतर काही बाबी त्यांच्याकडे कागदपत्राच्या नसल्यामुळे वाहतूक शाखेने त्यांना दंड ठोठावला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या पार्किंगवर ताबा, पोलीसांनी ठोठावला दंड
- Advertisement -