अहमदनगर : शहरातील माणिकनगर येथील रहिवासी वैभव म्हस्के हा विद्यार्थी दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी पासून बेपत्ता होता त्याचा तपास लावण्यात कोतवाली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे, वैभव म्हस्के बेपत्ता झाल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांना मिळताच त्यांनी तातडीने श्रेणिक शिंगवी व अभिजित खोसे यांना म्हस्के कुटुंबीयांची भेट घेऊन धीर देण्यास सांगितले, तसेच तात्काळ पोलीस अधीक्षकांची भेट घेत बेपत्ता मुलाचा तपास लावण्याकरिता निवेदन देत मागणी केली होती, त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील करण्यात आला. तर पोलीस प्रशासनाने देखील गांभीर्याने दखल घेत बेपत्ता मुलाच्या तपासाला गती दिली आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करत मुंबई येथून त्याला ताब्यात घेत अखेर त्या बेपत्ता मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची ४ महिन्यांनंतर भेट घडवून आणली, तर आपला मुलगा बेपत्ता झाल्यापासून म्हस्के कुटुंबीय त्याचा आज तरी शोध लागेल या आशेने दररोज ते वाट पाहत होते, आणि शेवटी त्या बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात कोतवाली पोलिसांना यश आले, याबद्दल म्हस्के कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाबरोबरच आ. संग्राम जगताप यांची भेट घेत आभार मानले, आणि आ, संग्राम जगताप हे आमच्यासाठी परमेश्वरच ठरले अशी प्रतिक्रिया म्हस्के कुटुंबीयांनी दिली,
तर आ. संग्राम जगताप हे त्या बेपत्ता मुलाची ४ महिन्यातील प्रवासाची कहाणी ऐकून थक्क झाले.
नगर शहरातील ‘त्या’ बेपत्ता मुलाची ४ महिन्यातील प्रवासाची कहाणी ऐकून आ. जगताप झाले थक्क
- Advertisement -