अहमदनगर-2007 साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. पहिल्याच निवडणुकीत मी विजयी झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद माझे आजोबा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व आमच्या आजी, ज्यांना आम्ही बाई म्हणायचो त्यांना झाला होता.
माझ्यासोबत माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांना बोलावून त्यांनी आमचा सत्कार केला आणि आशीर्वाद दिले. राजकीय जीवनातील तो पहिला सत्कार माझ्या जीवनात मला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे. आज तिर्थरुप दादांच्या जयंतीनिमित्ताने ही आठवण सगळ्यांना सांगावी वाटली.
याच निमित्ताने मला माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत, माझ्या प्रत्येक निवडणुकीत प्रोत्साहित करणाऱ्या, ‘सत्यजीत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है…’ म्हणत त्याप्रमाणे खरोखर साथ देणाऱ्या या फोटोतील व फोटोत नसणाऱ्या माझ्या सर्वच मित्रांना सलाम करतो.