नगर – समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या 1 आक्टोबर पासून सुरु असलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैर सोय होऊन उपचार मिळण्यासाठी अनेक अडचणी येत असून समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी विविध तालुक्यात जिल्ह्यात आमदार खासदार मंत्री यांना निवेदन देण्यात येत असून खासदार निलेश लंके यांना समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्रात यंदा सरासरी इतका पाऊस झाला तसेच त्या बरोबर ग्रामीण भागात. चिकगुनिया, डेंगू, गोचीड ताप व संसर्ग जन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात देवदूता सारखे मागील ५-६ वर्षांपासून आपल्या प्रधानमंत्री यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयुष्मान भारत योजनेतील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी उपकेंद्र स्तरावर खेडो पाडी असलेल्या गरीब जनतेला अतिशय कमी मानधनावर उत्कृष्ट रुग्ण सेवा देत आले आहेत परंतु मागील काही काळापासून वाढत्या महागाई व अपुऱ्या सोयी सुविधा या मुळे त्यांना काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी शासनाकडे वारंवार त्यांच्या अडचणी व मागण्यान सदर्भात पाठपुरावा केला तसेच वारंवार संप आंदोलणे सुद्धा केली परंतु या ढिम्म सरकारने वेळेनुसार फक्त कॉन्ट्रॅकटुअल असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी सीएचओ यांचा कामासाठी वापर करून घेतला परंतु त्यांच्या गरजाणंकडे नेहमीच काणा डोळा केला आहे. त्यामुळे आज समुदाय आरोग्य अधिकारी यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे.
दोन दिवस झाले संप सुरु होऊन परंतु अद्याप पर्यंत सरकार कडून कसले ही त्यांच्या मागण्यान सदर्भात मीटिंग साठी बोलवण्यात आले नसल्याचे संघटने कडून सांगण्यात आले आहे.
सरकार एक ना अनेक जी आर काडत आहेत परंतु सीएचओ यांच्या मागण्यान सदर्भात कधी जीआर निघेल याची वाट सर्वं सीएचओ पहात आहेत. या संपामुळे रुग्णांचे गैर सोय होत आहे. परंतु त्या सोबत समुदाय आरोग्य अधिकारी यांची सारकार प्रति दुज्या भावाची भावना वाढत आहे. येत्या काळात त्यांच्या मागण्यानबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधीकारी यांनी दिला आहे.
सरकार गरीब गरजू महिलांन साठी लडकी बहीण आणून त्यांची दसरा व दिवाळी गोड करत आहे. परंतु आमच्या महिला समुदाय आरोग्य अधिकारी सीएचओ याची दसरा व दिवाळी या ही वेळेस सुद्धा अंधारातच असेल का? असा प्रशन महिला समुदाय आरोग्य अधिकारी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री असलेल्या भावाला विचारत आहे अशी माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.अंकुश मानकर, महासचिव प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष डॉ.शैलेश पवार, डॉ सूर्यकांत यादव, उपाध्यक्ष डॉ.विशाल बाजड, सचिव प्रकाश मोरे, कार्याध्यक्ष डॉ.ज्ञानेश जाधव, सचिव डॉ.अजित पाटील, राज्य सल्लागार भारत घव्हाणे, शील दुधे आदी.
समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या
1) समुदाय आरोग्य अधिकारी सीएचओ हे पद निर्मिती करून आहे त्या पदावर समयोजन करावे.
2) सीएचओ यांच्या मानधनातं वाढ करून कामावर आधारित मोबदला पीबीआय बंद करावा.
3) सीएचओ यांना सरसकट बदली धोरण लागू करावे,
4) विमा कवच लागू करून कामावर असतानी मुर्त्यूमुखी पडलेल्या सीएचओ यांना त्याचा मोबदला मिळावा.
5) अति दुर्गम भागात काम करणाऱ्या सीएचओ यांना त्याचा अतिरिक्त मोबदला मिळावा.
6) लॉयल्टी बोनस मिळावा.
समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय…
- Advertisement -