नाशिक विभागात लवकरच लिपीकांच्या वरिष्ठ सहायक पदासाठी होणार स्पर्धा परिक्षा
लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहाय्यक पदी नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असून नाशिक विभागातील सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सन २०२३ व २०२४ या परिक्षेसाठी पात्र उमेदवारांचे अर्ज तात्काळ सादर करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले असल्याची माहिती माहीती लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्यसचिव अरुण जोर्वेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्त नाशिक यांना दि.२७ डिसेंबर २०२४ रोजीचे पत्रान्वये मर्यादीत स्पर्धात्मक परिक्षा सन २०२३ व २०२४ घेतलेली नसल्याने सदर परिक्षा तात्काळ घेणेबाबत निवेदन दिलेले होते. सदर परिक्षांबाबत दि. २७ जानेवारी २०२५ अखेर कार्यवाही सुरु न केल्यास दि. ७ फेब्रुवारी पासुन धरणे आंदोलन करणार असलेबाबत निवेदन देण्यात आलेले होते. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त नाशिक यांनी नाशिक विभागातील सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सन २०२३ व २०२४ या परिक्षेसाठी पात्र उमेदवारांचे अर्ज तात्काळ सादर करणेबाबत आदेश दिले असल्याचे जोर्वेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन निर्णय दि. १८ डिसेंबर १९८९ नुसार सदर परिक्षा माहे नेाव्हेंबर मध्ये घेणेबाबत निर्देश आहेत. परंतु विभागीय आयुक्तांकडुन सदर परिक्षा या विलंबाने घेतल्या जात होत्या. त्यामुळे लिपीकांमध्ये मोठा असंतोष होता. त्यामुळे विभागीय आयुक्तांना धरणे आंदोलनाची नोटीस देण्यात आलेली होती. त्याची दखल विभागीय आयुक्तांनी घेऊन परिक्षा घेणेबाबत कार्यवाही सुरु केल्याने लिपीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मुखेकर यांनी सांगीतले. लिपीकांच्या परिक्षा होत असल्याने संघटनेचे नामदेव वाजे, गणेशे तोटे, कल्याण मुटकुळे, योगेश पंडुरे, सुधीर खेडकर, राजु भोर, कैलास डावरे, दौलत नवले, विकी दिवे , दिपक वंडेकर, अनिल पंडीत, दिपक जोशी, चेतन चव्हाण , प्रविण वाकचौरे आदीनी समाधान व्यक्त केले.






