Saturday, May 18, 2024

पक्षाचा प्रचार…अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार!

अहमदनगर : सोशल मीडियावर एका राजकीय पक्षाचा प्रचार केल्याबाबत नगर तालुक्यातील एका शिक्षकाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षाकडे करण्यात आली आहे. मात्र, गेल्या सहा दिवसांत अद्याप या तक्रारीवर कार्यवाही झालेली नाही. आचारसंहिता कक्ष म्हणतोय तक्रार जिल्हा परिषदेकडे पाठवली, तर जि.प.चा शिक्षण विभाग म्हणतोय, संबंधित तक्रार अद्याप आली नाही. त्यामुळे आचारसंहिता तक्रारींची तत्काळ
दखल घेतली जाते, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. पाथर्डी तालुक्यातील फसले नावाच्या शिक्षकाने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर मोदी सरकारचा प्रचार होईल अशी पोस्ट फिरवली. याबाबत ४ एप्रिल रोजी आचारसंहिता कक्ष व जिल्हा परिषदेकडे तक्रार झाली आहे. तक्रारीत नाही. तसे म्हटले आहे की,आचारसंहिता काळात शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येत तसे आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई होते. तरीही हा
शिक्षक आचारसंहिता काळात खुलेआम विशिष्ट राजकीय पक्षाचे काम करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट टाकल्या जात आहेत.तसेच राजकीय पोस्टला लाइक करत आहे. ३ एप्रिल २०२४ रोजी या शिक्षकाने एका ग्रुपवर मोदी सरकारच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली. त्यमुळे या शिक्षकावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आचारसंहिता कक्षाकडे
विचारले असता, ही तक्रार जिल्हा परिषदेकडे पाठवली असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे मात्र ही तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.आचारसंहिता कक्षाकडून तत्काळतक्रारींची दखल घेतली जाते, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते. त्याबाबत कक्षात तशा यंत्रणाही कार्यरत आहेत. मग या शिक्षकाची पोस्ट कक्षाने सायबर सेलकडून तपासून तत्काळ दखल可घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित होतआहे.

संबंधित शिक्षकाबाबतची तक्रार आचारसंहिता कक्षाकडे दाखल झाली आहे. ही तक्रार जिल्हा परिषदेशी संबंधित असल्याने जिल्हा परिषदेकडे पाठवली आहे.
किरण देवतरसे, आचारसंहिता कक्ष अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles