Thursday, July 25, 2024

नगर जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत मोठा भ्रष्टाचार, भाजप पदाधिकाऱ्यांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत मोठा भ्रष्टाचार भाजप पदाधिकाऱ्यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार
अहमदनगर जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या घंटागाडी व त्या खरेदीत झाला मोठा भ्रष्टाचार याबाबत भारतीय जनता पार्टीचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे
याबाबत त्यांनी पत्रात म्हटले आहे की जिल्हा परिषदेने चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून इलेक्ट्रिक घंटागाडी घेतल्या त्यांची निविदा पारदर्शक नसल्यामुळे जवळपास 190 गाड्या वर दहा कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला आहे. परंतु त्या गाड्या अधिकृत डीलर किंवा कंपनीकडून न घेता असेंबल करून गावोगावी देण्यात आल्या दोन-तीन महिन्यात या संपूर्ण गाड्या बंद पडल्या यामध्ये दहा कोटी रुपये रकमेचा अपव्यय झाला असून ही सर्व रक्कम पाण्यात गेली आहे.
तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles