Wednesday, April 17, 2024

काँग्रेसच्या आमदाराला परदेशातून जीवे मारण्याची धमकी,पोलीस ठाण्यात तक्रार

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर परदेशातील होता. या कॉलची माहिती समोर आल्यानंतर जालन्यातील काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक,कार्यकर्त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिलीय.
या प्रकारणी सदर बाजार पोलिसांनी कारवाईला सुरवात केली असून आमदार कैलास गोरंट्याल हे मुबंईत असल्याने त्यांच्याशी पोलिस संपर्क करण्याचा प्रयन्त करत आहे.बाहेरील देशाच्या नंबर वरून हा कॉल आल्याने पोलिसांकडून हा नंबर मिळवण्याचा प्रयन्त केल्या जात असल्याची माहिती समोर आलीय.या धमकीच्या कॉल नंतर काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यां मध्ये एकच खळबळ उडालीय.

तर गोरंट्याल यांना बाहेरील देशातून या +1(579)300-0736 क्रमांकावरून धमकीचा कॉल आल्याने गोरंट्याल यांनी मुबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात दालल झाले. या प्रकारणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles