लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह चार राज्यांतील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये राव यादवेंद्र सिंह यांना मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या जागेवरून भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसच्या या यादीत एकूण 14 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. झारखंडच्या खुंटी मतदारसंघातून कालीचरण मुंडा, लोहरदगामधून सुखदेव भगत, हजारीबागमधून जयप्रकाश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील दमोहमधून तरवर सिंह लोधी आणि विदिशामधून प्रताप भानू शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे
Congress Party releases its eight list of candidates for the Lok Sabha elections. pic.twitter.com/dnVKmGnlKE
— ANI (@ANI) March 27, 2024