Saturday, May 18, 2024

शेतकऱ्यांची कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती,महिलांना वर्षाला १ लाख रुपये… कॉंग्रेसची गॅरंटी..,

काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.श्री. नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते मा.श्री.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते मा.श्री.विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंत पाटील, खासदार मा.श्री.चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी मा.श्री.माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.आशिष दुआ, माजी मंत्री मा.श्री.सतीष चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार मा.श्री.विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर, यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles