काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजीनामा सोपवण्यासाठीच अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले होते अशी माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असून राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे.
भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल असून, नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.