लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमधील अनेक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला होता. विखे पाटलांच्या या दाव्यावर कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
विखे पाटील यांच्या या विधानावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले असून भाजपाच्या संपर्कात कोण कोण आहेत त्यांची नावे जाहीर करावी, असं गुपीत ठेऊ नये…” असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.