अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पण, अजित पवारांच्या बंडाची कुणकुण लागली होती, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.
“काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. अजित पवार हे सभेत फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करायचे. पण, फडणवीसांना मोकळे सोडायचे, हे जाणवत होते,” असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.