अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली आहे. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जयश्री थोरात या सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या जयश्री थोरात यांनी आता थेट सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्यानतंर डॉ. जयश्री थोरात सक्रीय राजकारणात आल्या आहेत. त्यामुळे थोरातांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आली आहे.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हेदेखील काँग्रेसमध्ये होते. थोरात कुटुंबाचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक दशकांपासून एकहाती वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळलेले थोरात हे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा स्थितीत त्यांनी आपली कन्या जयश्री थोरात यांना तालुका स्तरावर सक्रिय करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एन्ट्री
- Advertisement -