पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आला. माध्यमांसोबत बोलतानाच ते खुर्चीवरून खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंगाचा थरकाप उडवणारी कर्नाटकमध्ये घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
सी.के रवीचंद्रन असं मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविचंद्रन हे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या समर्थनार्थ सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषद घेत होते. पत्रकारांच्या प्रश्नांची ते सडेतोडपणे उत्तरे देत होते.
याचवेळी रविचंद्रन यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते खूर्चीवरून खाली कोसळले. यामुळे पत्रकारपरिषदेत मोठी खळबळ उडाली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनी रवीचंद्रन यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
https://x.com/nkaggere/status/1825481328105816414?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1825481328105816414%7Ctwgr%5Eb665260b16932c525be0ac143b80f16ca967e0b2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fcongress-leader-ck-ravichandran-died-heart-attack-in-bengaluru-karnataka-shocking-video-ssd92