Tuesday, September 17, 2024

धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबासह विष पिऊन आत्महत्या केली. या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष खाल्लं. या चौघांनी विष खाल्ल्याचं लक्षात येताच या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या चौघांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या मोठ्या मुलाचा मृत्यू लगेच झाला. इतर तिघंही गंभीर होते. मात्र नंतर या तिघांचाही मृत्यू झाला.

ही घटना छत्तीसगढची आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय ६५, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक १०) यांनी त्यांच्या पत्नीसह आणि दोन मुलांसह विष खाल्लं. पोलीस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय ५५), मुलगा सूरज यादव (वय २७) आणि निरज यादव (वय ३२) यांच्यासमवेत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या चौघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होते आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles