महाराष्ट्रापाठोपाठ आज गुजरातमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा आणि त्यांचे पूत्र संग्रामसिंग राठवा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेस आमदार अर्जुन मोधवाडिया यांच्यासह दोन माजी आमदारांनी सोमवारी (४ मार्च) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. आज या तिघांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे. अर्जुन मोधवाडिया यांचं पक्षातून बाहेर पडणं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय.
काँग्रेसचे तीन माजी आमदार अर्जुन मोधवाडिया, अंबरीश डेर आणि मुलू भाई कंडोरिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या तिन्ही नेत्यांनी आज (५ मार्च) दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. मोधवाडिया आणि डेर यांनी कालच त्यांच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.