Monday, July 22, 2024

काँग्रेस संस्कृती? कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय Video

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं.
https://x.com/BJP4Maharashtra/status/1802953608256008527
यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत त्यावेळी संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं हाताने धुतलेय. विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles