विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं ते लवकरच भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.
काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भाजपचे काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोहन हंबर्डे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, काही दिवसांपूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मोहन हंबर्डे हे देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप केला आहे. त्यामुळं हंबर्डे देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे.