Monday, June 17, 2024

भर सभेत राहुल गांधी यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतलं पाणी… व्हिडिओ

राहुल गांधी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी रुद्रपूरमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी पाणी पिण्यासाठी बॉटल हातात घेतली. तेवढ्यात नागरिकांनी गर्मी गर्मी असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. तेवढ्यात आज जास्तच गर्मी आहे, असं म्हणत त्यांनी थेट थंड पाणीच डोक्यावर ओतले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
https://x.com/INCIndia/status/1795394803087417800
देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका राजकीय नेत्यांनाही बसतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही उन्हामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधीनी भाषणदरम्यान चक्क थंड पाणी डोक्यावर ओतले. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles