काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी आता उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून खासदार राहणार आहेत.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ राहुल गांधी यांनी सोडल्यानंतर आता त्या मतदारसंघामधून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या पोटनिवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाची खासदारकी सोडताना वायनाडमधील जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच प्रियंका गांधी त्या मतदारसंघामधून पोटनिवडणूक लढवणार असल्यामुळे आम्ही जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं.