Monday, June 17, 2024

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून विधानसभा लढवावी

नगर शहराला विकासाच्या प्रगतीपथावर आणण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवुन आमदार व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात जो निकाल लागला त्यावरून विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मोठा उलटफेर होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. नगरकरांनी फसवा विकास दाखवणाऱ्या विद्यमान खासदाराला एकमतानं हरवले. त्यानंतर आता नगर शहर विधानसभा मतदारसंघात शहराच्या सर्वांगीण विकासाची जाण असलेले नेतृत्व मिळावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने दीप चव्हाण यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वांनी मान्यता द्यावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे म्हटले आहे.

या संदर्भात लवकरच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून नगर शहराची जागा काँग्रेस पक्षाला सोडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करणार आहे. एकेकाळी नगर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दादाभाऊ कळमकर, माजी राज्यमंत्री असेरी, शिवाजीराव नागवडे, राजीव राजळे, थोरात साहेब यांनी आपल्या कार्यकाळात नगर जिल्ह्यासह राज्यात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आणि आपापली शहरे विकसित केली.

संगमनेर शहरासह तालुका तर विकासाच्या प्रगतीपथावर प्रचंड घोडदौड करतो आहे. नगरमध्येही सहकारी साखर कारखाना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची प्रगत औद्योगिक वसाहत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संकुले थोरात साहेबांच्या संकल्पनेतून येतील. फूड पार्क, आयटी पार्क, कार्गो हब नगरमध्ये होऊ शकेल. नगरला दादाभाऊ कळमकर आमदार अनिल राठोड यांच्यानंतर हक्काचा माणूस मिळालेला नाही. आता तर दहशत, गुंडगिरी, ताबेदारी याचा सपाटाच सध्या सुरु आहे. यामुळे नगर बदनाम होते आहे. नगरकरांच्या भल्यासाठी थोरात साहेबांना उमेदवारी मिळावी अशी विनंती वरिष्ठांना करणार असल्याचे ही ते म्हणाले आहे.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles