Monday, December 4, 2023

“या निमित्ताने” नगर शहरातील काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आले एकत्र…

अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या विशेष आरतीचे आयोजन काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सव आनंदात पार पडू दे, बळीराजासाठी पाऊस पडू दे असे साकडे बाप्पा चरणी यावेळी घालण्यात आले. आरती नंतर माळीवाडा गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी उपस्थितांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार केला. यावेळी देवस्थानचे संगमनाथ महाराज यांची विशेष उपस्थिती होती.

शहरभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अबाल वृद्ध यामध्ये सहभागी झाले आहेत. घराघरात गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री विशाल गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. काँग्रेस, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील एकत्र येत गणेशोत्सवानिमित्त विशाल गणपतीची आरती केली. यावेळी बाप्पाचा जयघोष करण्यात आला. महापौर शेंडगे दांपत्य, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे दांपत्य यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी बाप्पाची आरती केली.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, शिवसेना शहर उपप्रमुख संदीप दातरंगे, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक संतोष गेनप्पा, माथाडी काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, शहर जिल्हा सचिव रतिलाल भंडारी, रोहिदास भालेराव, सहसचिव गणेश आपरे, सचिव शंकर आव्हाड, स्नेहलताई काळे, शिवसेना महिला आघाडीच्या अरुणाताई गोयल, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, रोजगार व स्वयंरोजगार विभाग शहर जिल्हाध्यक्ष राणीताई पंडित, महिला उपाध्यक्ष सुनीताताई भाकरे, सोशल मीडिया काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आर. आर. पाटील, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, क्षेत्रे दादा, सावेडी काँग्रेस विभागाचे स्वप्निल सातव आदींसह काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: