ग्रेस पक्षाने शुक्रवारी आगामी तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसने माजी खासदार मधु गौड़ यास्खी यांना लाल बहादूर नगर येथून निवडणूक मैदानात उतरवलय. टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलय. तेलंगण निवडणुकीसाठी अधिसूचना 3 नोव्हेंबरला जारी करण्यात येईल. मतदान 30 नोव्हेंबरला होईल आणि निकाल 3 डिसेंबरला जाहीर होईल. काँग्रेसचा तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचार सुरु आहे. स्वतंत्र तेलंगण राज्याची स्थापन झाल्यापासून के.चंद्रशेखर राव यांचं बीआरएस पक्ष सत्तेवर आहे.