Wednesday, April 17, 2024

काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका, आयकर विभागाकडून पक्षाची बँक खाती गोठवली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस आणि युवा काँग्रेसचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिलीये. पक्षाचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आल्याचं आम्हाला सांगितल आहे. काँग्रेस पक्षाची देखील खाती गोठवण्यात आली आहेत. आम्हाला समजलं की युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आयकराने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. आमच्या खात्यांमध्ये क्राउडफंडिंगचे पैसे गोठवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी जेव्हा विरोधी पक्षांची खाती गोठवली जातात तेव्हा हे लोकशाही गोठवण्यासारखेच आहे, असा दावा अजय माकन यांनी केलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles