Saturday, October 5, 2024

नगरमध्ये मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र

मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र – डॉ परवेज अशरफी

नगर – शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र करत असल्याचे निवेदन एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री,अल्पसंख्याक आयोग, खा. असद्दुद्दिन अवैसी, एम आय एम प्रदेशाध्यक्ष मा. खा. इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांना दिले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीत दुरुस्ती आणि हरकती घेण्याचे काम चालू आहे. निवडणूक आयोगात काही सताधारी आणि विरोधकांनी अर्ज करून हरकत नोंदवली असल्याचे समजते. त्या अनुषंगाने अहमदनगर मध्ये लोकसभा निकाल नंतर सर्वांचे लक्ष मुस्लिम मतदारांकडे असून बहुतांश मुस्लिम नागरिकांना नाव वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे आणि नाव कमी करण्यासाठी निवडणूक अधिकारीने पत्र पाठवले आहे.त्यात ज्यांनी आक्षेप घेतले त्यांचे नाव आणि का घेतले याची माहिती दिली आहे. ज्या पक्षाला आणि ज्या आघाडीला मुस्लिम समाजाने लोकसभेत निवडून येण्यासाठी आहोरात्र कष्ट केले त्याच पक्षाचे व आघाडीचे नेत्यांनी मुस्लिम समाजाचे मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी आक्षेप किंवा हरकत घेतल्याचे दिसते.
विशेष म्हाणजे हरकत घेत असतांना त्यांचे मतदार यादी, मतदार नोंदणी क्रमांक, इपिक क्रमांक सर्व वेगवेगळे असतांना देखील जाणून बुजून घेतल्याचे दिसते. मुस्लिम समाजात एकच नावाचे एक पेक्षा जास्त व्यक्ती असतात त्यामुळे प्रत्येक मतदार यादीत सारखे नाव असण्याची शक्यता आहे. तसेच आम्ही जे नोटीस पाहिली त्यात एकच नावाचे दहा वेगवेगळ्या यादीत नाव असल्याचे पत्र निवडणूक शाखेने दिले आणि कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. परंतु त्या पत्राला व्यवस्थित पाहिले तर एकच नावाचे दहा वेगवेगळे व्यक्ती असल्याचे निदर्शनास येते कारण सर्वांचे मतदार क्रमांक, एपिक क्रमांक, यादी क्रमांक सर्वच वेगळे वेगळे आहे. फक्त आक्षेप घेतल्याकरणाने या सर्वांना नोटीस दिली आल्याचे दिसते. या मागचे एकच षडयंत्र म्हणजे एक सारखे वेगवेगळ्या व्यक्तीचे नावावर आक्षेप घेऊन ते सर्व नाव कमी करणे. मुस्लिम समाजात एकच व्यक्तीचे आणि एकच आडनावाचे असंख्य नागरिक असतात
आणि आहे याची शहानिशा आपल्या अधिकारी मार्फत आपण निष्पक्ष केली तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व व्यक्ती वेगवेगळे असून फक्त मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे हेतूनी षड्यंत्र या लोकांनी केले असल्याचे चित्र दिसत आहे.
तरी आपण या षड्यंत्राचे भागीदार न होता आपल्या अधिकारी किंवा कर्मचारी मार्फत निष्पक्ष चौकशी करून मतदार यादीतून मुस्लीम समाजाचे नाव कमी करण्याचे षडयंत्राला हाणून पडावे. आणि वेगवेगळ्या यादीत एक सारखे असलेले नाव तसेच अबाधित ठेवावे ही मागणी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी शासनाच्या विविध मंत्र्याकडे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आपला
डॉ परवेज अशरफी 9890006580

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles