अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सोमवारी रात्री सुपा येथील पवारवाडी जवळ कंटेनर रस्त्यावर आडवा होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर क्रमांक एमएच 14 सीई 2978 हा अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना सुपा पवारवाडीतील घाटात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. त्याचवेळी पलटी झालेला कंटेनर एका कारवर आदळून रस्त्यावर आडवा झाला. या अपघातावेळी कंटेनरमध्ये चार व्यक्ती होते. यातील दोघे गंभिर जखमी झाले. तर दोन व्यक्तींना नागरिकांनी कंटेनरमधुन सुरक्षित बाहेर काढले.
या अपघातामुळे अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतुक दोन्ही बाजुने पुर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुने एक दोन किलोमीटरपर्यत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचेे अंमलदार वेठेकर, अमोल धामणे हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुपा पोलिसांनी व पवारवाडीच्या युवकांनी वाहतुक सुरूळीत चालु केली.