Saturday, October 12, 2024

पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात कंटेनरने चिरडले, एकाचा जागीच मृत्यू तर ६ जण जखमी

नगर – नगर हून छत्रपती संभाजी नगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरचे पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कामगाराला चिरडले. त्यानंतर २ मोटारसायकल, १ टेम्पो व १ हार्वेष्टर अशा चार वाहनांना धडक दिली. यात एकाचा मृत्यु तर ६ जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.७) दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.

रामदास पवार (वय ३५, रा.नाशिक) असे या अपघातात मयत झालेल्या कामगाराचे नाव असून जखमींची नावे समजू शकली नाहीत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की एक मालवाहू कंटेनर नगर हून छत्रपती संभाजी नगरकडे भरधाव वेगात जात होता. पांढरी पूल च्या अलीकडे असलेल्या इमामपूर घाटात उतरला या कंटेनरचे ब्रेक फेल झाले.

त्यामुळे चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले आणि तो कंटेनर समोर चाललेल्या वाहनांना पाठीमागून धडक देत निघाला. सुरुवातीला त्याने महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करणारे कामगार रामदास पवार यांना चिरडले. त्यानंतर पुढे चाललेल्या २ मोटारसायकलींना धडक दिली.

पुढे एका टेम्पोला धडक दिली. या धडकेने टेम्पो रस्त्यावर उलटला. पुढे जावून कंटेनरने एका हार्वेष्टरला धडक दिली. तो हार्वेष्टर रस्त्याच्या बाजूला उडून पडला. या अपघातात खड्डे बुजविण्याचे काम करणारा कामगार रामदास पवार हा जागीच ठार झाला तर धडक बसलेल्या ४ वाहनांतील ६ जण जखमी झाले.

जखमींना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून नगरला हलविले. ४ वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर पांढरी पुलाजवळ जावून थांबला. त्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर तेथेच सोडून धूम ठोकली. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles