राज्यातील कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत पत्रकारपरिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे. कंत्राटी भरतीविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.
यापार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्रात कंत्राटी भरतीसंदर्भात मोठ्या प्रमाणात गदरोळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेषतः जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करताहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कंत्राटी भरतीचे दोषी कोण? हे समाजापुढे आले पाहिजे. टीका करण्याऱ्यांची थोबाडं उघडी पडली पाहिजेत या दृष्टीने काही गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय मार्च २००३ साली झाला होता. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मोठी बातमी! राज्यातील कंत्राटी भरती…. देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Advertisement -