राज्यातील कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रियेवरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच राज्यातील कंत्राटी भरतीचे जीआर रद्द करण्याचा निर्य़ण सरकारने घेतला असल्याची घोषणासुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. जे काही कंत्राटी भरतीचे जीआर निघाले ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारनेच काढले असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली. आधीच्या सरकारचं पाप आपण का उचलायचं. त्या सरकारने केलेले कंत्राटी भरतीचे जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही जीआर रद्द केल्यानंतर काँग्रेस, उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रावादी काँग्रेस माफी मागणार का? युवकांची फसवणूक केल्याबद्दल माफी मागणार नसेल तर आम्हाला सगळी कागदपत्रे जनतेपर्यंत नेऊ अशा शब्दात विरोधकांना फडणवीसांनी इशारा दिला.