Wednesday, April 30, 2025

संशोधनात धक्कादायक खुलासा,कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आवाज जाण्याचा धोका!

कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेक गंभीर आरोग्य समस्या समोर आल्या आहेत. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतासह चीन-सिंगापूर अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे शारीरिक समस्या अनेक प्रकारे वाढू शकतात, त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की चव आणि वासानंतर आता कोरोना संसर्ग आवाज देखील हिरावून घेऊ शकतो. कोविड-19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे.अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स डोळे आणि कान स्पेशालिस्ट रुग्णालयातील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंत देखील निर्माण होऊ शकते. यामुळे व्होकल कॉर्डला पॅरालिसीस होतो, ही बाब समोर आली आहे.
जर्नल पेडियाट्रिक्समधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे केवळ चव आणि वासच नाही तर घशाचा आवाज देखील जाऊ शकतो. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणतात.
देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 752 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षी 21 मे नंतर प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमध्ये दोन आणि राजस्थान-कर्नाटकमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3420 वर पोहोचली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles