Wednesday, February 28, 2024

अहमदनगर जिल्हयात शेवगांव येथे कापूस खरेदी केंद्रावर सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू

शेवगाव कापूस खरेदी केंद्रावर सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू

अहमदनगर दि.8 कापूस पणन महासंघाच्या छ.संभाजीनगर विभागातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की, अहमदनगर जिल्हयात शेवगांव येथे कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफ.ए.क्यु.प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. तसेच मिरजगाव या केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे.

तरी सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा असे प्र. विभागीय व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles