सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा कपल डान्स पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल. या व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या बायकोबरोबर तुफान डान्स करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या कार्यक्रमाचा निर्माता क्रांती माळेगावकर मधूर आवाजात स्टेजवर गीत गात आहे तर त्या गीतावर अनेक कपल डान्स करत आहे. त्यातील एक व्यक्ती बायकोला बाजूला उभे करुन एकटाच तुफान डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने हाच व्यक्ती बायकोला कडेवर उचलून डान्स करताना दिसतो. हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.