सोशल मीडियावर व्हायरल व्हावं, सर्वत्र आपली चर्चा असावी, आपल्याला लाखो व्हुव्ज मिळावेत यासाठी आजकाल प्रत्येकजण काहीही अतरंगी प्रकार करताना दिसत आहे. रिल व्हिडीओ बनवण्याच्या नादात आपण नेमकं काय करतोय याचं भान देखील नागरिकांना राहिलेलं नाही. अशातच सोशल मीडियावर एक खतरनाक स्टंट रिलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वहिरीच्या मधोमध बांधलेल्या या खाटेवर दोघेही बसलेत आणि एका गाण्यावर डान्स करत आहेत. तसेच एक व्यक्ती विहिरीबाहेर उभा राहून यांचा रिल व्हिडीओ शूट करत आहे. @sjetivadi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.