भारताच्या सर्वच राज्यांमध्ये आता मान्सूनचे आगमन झाले आहे. उन्हाने रखरखलेले रस्ते पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे माणसांच्या वागण्यात आलेला रुक्षपणा पहिल्या मातीच्या सुगंधामुळे निघून गेला आहे. जशी झाडाला नवी पालवी फुटावी तसा आनंद ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. कधी रस्त्यात कुत्र्यांबरोबर नाचून लहान मुलांचा डान्स व्हायरल होतोय तर कधी उंदीरमामा स्वतः पावसात नाचताना दिसत आहेत. अशातच एका जोडप्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एरवी रस्त्यात लोकांचा रोमान्स पहिला की अक्षरशः संस्कार काढणारे लोक सुद्धा या जोडप्याचा गोड क्षण पाहून आपल्याबाबतही असं काही घडावं अशी प्रार्थना करतायत. तर काहींनी मात्र आपल्याबाबत असं का घडू शकत नाही याची धम्माल कारणे दिली आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक जोडपं रस्त्याच्या कडेला बाईक लावून पावसात नाचताना दिसत आहेत. एकमेकांकडे पाहताना, हसत, लाजत, हातात हात घेऊन हळुवार पद्धतीने केलेला डान्स पहिल्यांदाच नेटकऱ्यांना खूप रोमँटिक वाटला आहे. एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटातील सीन वाटावा अशा पद्धतीने ते दोघे कोणत्याही म्युझिकशिवाय आनंद अनुभवतायत. साधारण व्हिडीओचे बॅकग्राऊंड पाहता ही वेळ रात्रीची असावी कारण एकतर अंधार दिसतोय पण रस्त्यात गर्दी सुद्धा तशी फारशी नाहीये.
https://x.com/themayurchouhan/status/1798965072880173290?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1798965072880173290%7Ctwgr%5Ec0967b643fc2d94b0e164d5320f277e7204c4044%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fvideo-couple-dancing-in-rain-romance-on-road-viral-single-people-got-sad-saying-there-are-just-potholes-on-roads-in-monsoon-not-love-svs-99-4428487%2F