शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी असलेला संदीप कोतकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून आचारसंहितेचा भंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी ही अय शिथिल करण्याचा आदेश दिला आहे. मात्र कोतकर केडगाव दुहेरी हत्याकांडातही संशयित आरोपी आहेत. या खटल्यातही न्यायालयाने त्यांना सुनावणीच्या तारखेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे.ही जिल्हाबंदी हटवण्याची मागणी करणारा अर्ज कोतकर यांनी वकील विवेक म्हसे यांच्यामार्फत 15 सप्टेंबरला दाखल केला.
दरम्यान,न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दरुपयोग करून संदीप कोतकर याने काल नगर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून विनापरवानगी जंगी मिरवणूक काढली होती.ही मिरवणूक केडगाव मधून जात असताना संदीप कोतकर व त्याचे सहकारी यांनी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या आईला धमकावल्यासंबंधी संग्राम कोतकर यांनी काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी वेगळी फिर्याद दाखल केली आहे
एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच मूळ फिर्यादी यांच्यातर्फे केलेला युक्तिवाद लक्षत घेऊन न्यायालयाने संदीप कोतकर याचा जिल्हा बंदी उठवण्यासंबंधीचा अर्ज आज रोजी फेटाळला आहे.