Thursday, July 25, 2024

नगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा धडाका, दुसऱ्या दिवशी ४५ कर्मचारी….

मनपा गेटवर दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांची हजेरी ; ४५ कर्मचारी आले उशिरा

आयुक्तांनी दिली शेवटची वॉर्निंग , कडक कारवाई केली जाणार – आयुक्त पंकज जावळे

नगर : अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १ हजार रुपयांचा दंड करूनही दुसऱ्या दिवशी १५५ कर्मचाऱ्यांपैकी ४५ कर्मचारी हे कामावर उशिरा आले, यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत सांगितले की,आता शेवटची वॉर्निंग असून कारवाईला तयार रहा. असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला
मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना कर्मचाऱ्यांची गेटवर हजेरी घेण्यास सांगितले होते यावेळी कार्यालयीन वेळ होवून गेली तरी देखील ४५ अधिकारी कर्मचारी हे वेळेत हजर झाले नाही, यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच सर्व कर्मचार्यांनी ओळखपत्र व युनिफोर्म मध्ये कामावर यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles