या व्हिडीओमध्ये तुम्ही एका काकांना पाहू शकता. जे भारतीय फलंदाजीच्या अपयशाची कारणं सांगत आहेत. रोहित शर्माला कसं फसवलं, सुर्यासाठी काय प्लान केला होता? ट्रेव्हिस हेडनं कशी बॅटिंग केली? या सर्व गोष्टी अगदी हातवारे करून हे काका सांगत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ९४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या काकांच्या क्रिकेट विश्वेषणाचं कौतुक केलं आहे. कोणी म्हणतेय, “त्यांना राहुल द्रविडच्या जागी कोच करा”, तर कोणी म्हणतेय, “भारतीय संघाचा बॅटिंग कोच बनवा.”
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माला फसवलं…काकांचे थक्क करणारे विश्लेषण…व्हिडिओ
- Advertisement -