Thursday, July 25, 2024

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर- आ.राम शिंदे

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर – आमदार प्रा.राम शिंदे

हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : पीकविमा मंजुर होताच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम 2023 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पीकविमा मंजुर व्हावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला मोठे यश मिळाले आहे. महायुती सरकारने कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजुर केला आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये 2023 च्या खरिप हंगामात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे खरिप पिके वाया गेली होती. त्याचबरोबर जे काही पिके उगवून आली होती ते काढणीवेळी झालेल्या पावसामुळे वाया गेली होती. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली होती. खरिप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. खरिप हंगामातील पिके वाया गेल्यामुळे नुकसान भरपाई पोटी मिळणारा पिक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी महायुती सरकारकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. 2023 च्या खरिप हंगामाचा पिक विमा मंजुर करून आणण्यात आमदार शिंदे यांना मोठे यश मिळाले आहे.आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघासाठी एकुण 12 कोटी 68 लाख रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. पीकविमा कंपनीने मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.

जामखेड तालुक्यासाठी 7 कोटी 8 लाख 36 हजार 446 रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. तर कर्जत तालुक्यासाठी 5 कोटी 60 लाख 24 हजार 793 रूपयांचा पीकविमा मंजुर झाला आहे. ही सर्व रक्कम मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीकविमा मंजुर केल्याबद्दल मतदारसंघातील शेतकरी बांधवांकडून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

पिक कापणी प्रयोगावरती आधारित पिक विमा मंजूर करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे. लवकरच हाही पीकविमा मंजुर होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होणार आहे.जामखेड तालुक्यात मूग उडीद व सोयाबीन आणि कर्जत तालुक्यात मक्का उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2024च्या खरिप हंगामाच्या प्रारंभी कर्जत जामखेड मतदारसंघात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यंदाच्या खरिप हंगामासाठीचा पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील कोणीही शेतकरी बांधव पीकविमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या कर्जत व जामखेड येथील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमांतून त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील बाजार समित्यांच्या माध्यमांतून मोफत पीकविमा भरून दिला जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पीकविमा भरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना मोफत पीकविमा भरून दिला जात आहे. सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलैच्या आत पीकविमा भरून घेण्याचा लाभ घ्यावा, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले आहे.

खरिप हंगाम 2023 मध्ये पावसाने ओढ दिल्याने त्याचबरोबर पीक काढणीवेळी पाऊस आल्याने खरिप हंगाम वाया गेला होता. कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी बांधवांना पीकविमा मिळावा यासाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जामखेड तालुक्यासाठी 7 कोटी 8 लाख 36 हजार 446 रूपयांचा तर कर्जत तालुक्यासाठी 5 कोटी 60 लाख 24 हजार 793 रूपयांचा असा एकुण 12 कोटी 68 लाखांचा पीक विमा मंजुर केला आहे. अजूनही ऊर्वरित शेतकऱ्यांचा पीकविमा मंजुर होणार आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मंजुर केल्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून आभार !

– आमदार प्रा राम शिंदे, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य *

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles