केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची वृत्त हाती आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेटने या महत्वाच्या निर्णयाला मंजुरी दिली ‘न्यूज१८’च्या वृत्तानुसार, महगाई भत्त्याचा नवा दर १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या आधी ४२ टक्के महागाई भत्ता मिळत होता, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४६ टक्के भत्ता मिळणार आहे. या निर्णयाचा पेन्शनधारकांना देखील याचा फायदा मिळणार आहे
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशातील १ लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार/पेन्शनमध्ये वाढ पाहायला मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळवेतन हे ५०,००० रुपये असेल, तर त्या कर्मचाऱ्याला ४ टक्क्यांनुसार २००० रुपयांची वाढ पगारात मिळेल. यानुसार, त्या केंद्रीय कर्मचाऱ्याला पुढील महिन्यात पगारात २००० रुपये वाढीव मिळतील.
रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सरकारने खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारच्या या कॅबिनेटमध्ये तीन मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा देखील सामावेश आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना ७५ दिवसांचे वेतन हे बोनस म्हणून मिळेल. तसेच सरकारकडून ६ रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.