नगर: राज्यातील प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत मॅनेजिंग कौन्सिल निवडण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कौन्सिल सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. उत्तर विभाग मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, भागिरथ शिंदे, माजी आमदार राहुल जगताप, मीनाताई जगधने आदींचा यात समावेश आहे.
माजी आमदार दादाभाऊ कळमकर १८ वर्षांपासून आशिया खंडातील या सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेवर कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी कळमकर यांना विविध पदांवर संधी दिली आहे. कळमकर यांनी संस्थेचे उपाध्यक्षपद, उत्तर विभाग अध्यक्ष पद तसेच चार वेळा मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपद भूषविले आहे.
या निवडीबद्दल माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






