Tuesday, June 25, 2024

पारनेरमध्ये दलित महिलेला मारहाण, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महीलेला खा.निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जावून केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपीना जामीन होणार नाही आशा पध्दतीची कारवाई करावी आशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकरी कार्यकर्ते आणि महीलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे,पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे श्रीगोंद्याचे राजा जगताप पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू राहाता तालुका अध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनवणे स्नेहल सांगळे वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील घटनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खा.निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या सहकार्यानी ६जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डाॅ सुजय विखे पाटील यांचा प्रचार केल्याच्या कारणाने विखे समर्थक प्रितेश पानमंद यांना मारण्याच्या हेतूने त्यांच्या घरी गेले.मात्र ते घरात नसतानाही लंके समर्थकांनी प्रितेश यांच्या पत्नी तसेच आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अंगावरील ड्रेस फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व पोटातही लाथा मारल्या.घटनेनंतर सदर महीलेला पोलीस स्टेशनलाही जाता येवू नये असे दहशतीचे वातावरण निर्माण केले गेल्याची बाब पदाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शानास आणून दिली.

या घटनेमुळे पिडीत कुंटूबिय अजूनही भीतीच्या सावटाखाली असून,गावातही तसेच वातावरण आहे.राजकीय वैमानस्यातून आशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेवून या मधील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करावी आशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली.

राजकीय दबावातून आरोपीना पाठीशी घलण्याचे काम झाले तर संपूर्ण जिल्ह्यात आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही शिष्टमंडळाने निवेदनातून दिला आहे.

या घटनेबाबत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अवगत करण्यात आले असून त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.लवकरच पिडीत कुटूबियांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले साहेब पारनेर येथे येणार आहेत. आरोपींना कुठल्याही परीस्थीती जामीन होणार याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी आशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles